gutkha.jpg 
मुंबई

ठाण्यात एफडीएकडून तब्बल 2 कोटींचा गुटखा जप्त ; पाच ट्रकवर कारवाई

राहूल क्षीरसागर

ठाणे  ः ठाणे-मुंबईत विक्रीसाठी पाच ट्रकमधून येणारा तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास यश आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थांचे सेवन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. असे असतानादेखील तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे.

ठाण्यातील गायमुख घोडबंदर रोड भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाच ट्रकमधून बेकायदा गुटख्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित ट्रकवर कारवाई करण्यात आली. या वाहनांची तपासणी केली असता, त्यात तब्बल 1 कोटी 70 लाख 45 हजार 596 रुपयांचा गुटखा सापडला. या गुटख्याच्या साठ्यासह 50 लाख रुपये किमतीची पाच वाहने
अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केली असून या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   Gutka worth Rs 2 crore seized from Kasarawadwali police

(संपादन ः रोशन मोरे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Arrested : सीजेपीचे मुख्य सुत्रधार सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदेंना ५ दिवसांची कोठडी; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापलं

नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीत अग्नितांडव, २ महिलांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जणांची सुखरुप सुटका

Kas Plateau Flower Season 2026 Closure : महत्त्वाची बातमी! दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जागतिक वारसा स्थळ 'कास पठार' पर्यटकांसाठी एक महिना आधीच बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News : अभिजीत दिपके थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार

CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

SCROLL FOR NEXT